माझे नेत्रदान प्रचार-प्रसार कार्य
१९८१च्या सुरुवातीस मी वैयक्तिक पातळीवर कल्पाक्कम,तमिळ नाडू येथे नेत्रदान प्रचार-प्रसार कार्यास सुरुवात केली.
घरात कोणाला अंधत्व आले किंवा अंधत्व घेऊनच कोणी जन्माला आले म्हणून मी हे काम सुरु केले की काय असे काही जणांना वाटते परंतु तसे काहीच नाही.अणुशक्ती खात्यातील नोकरीनिमित्ताने १९७१ ते १९९१ माझे वास्तव्य तेथे असतांना १९८०च्या अखेरीस Reader's Digest मध्ये 'Sri Lanka gives eyes to the world' हा लेख मी वाचला आणि अचंबित झालो. हा इवलासा देश ३६ देशांना नेत्र पुरवतो हे वाचून फारच आश्चर्य वाटले.याला कारणीभूत होते डॉ. हडसन सिल्वांचे अथक प्रयत्न आणि त्यांना मिळालेली त्यांच्या पत्नीची साथ!
काही दिवसांतच ८० कि.मी.वरील चेन्नैला जाऊन तेथील सरकारी(भारतातील पहिल्या)नेत्रपेढीतून माहिती घेतली. लगेचच कार्यालयात सूचना लावून,अर्ज सायक्लोस्टाइल करून घेऊन कार्याला सुरुवात केली. मुंबईला जे जे आणि हरकिसनदास रुग्णालयांतील नेत्रपेढ्यांतून माहिती घेतली. भारतात नेत्ररोपणे होतात त्यातील अर्धे अधिक नेत्र हे श्री लंकेतून येतात हे वृत्तपत्रांतून वाचून फारच लज्जास्पद वाटले.
आपला एवढा मोठा देश आणि हे असले अत्यंत लाजिरवाणे परावलंबन? थूत!
त्या वेळी एकूण दृष्टिहीन होते ८० लाख, नेत्ररोपणाने दृष्टी मिळू शकणारे त्यात होते २० लाख आणि नेत्रदाने होत होती फक्त अडीच हजार! आपण थंड होतो,षंढ होतो आणि श्री लंका आपल्याला नेत्र पुरवीत होती. आजही आपण अगदी तसेच आहोत आणि श्री लंका नेत्र पुरवतेच आहे.
हे सर्व पाहता आपल्याला जमेल तेवढे,जमेल तसे आणि जमेल तेथे या क्षेत्रात काही ना काही करीत राहण्याची भावना सहजीच मनात रुजली.
दसऱ्याला आयुधा पूजा व्हायची,या निमित्ताने थोडी मानवतेचीही पूजा करा अशी सूचना लावल्यावर बरा प्रतिसाद मिळाला. नंतर देशात मोठा दुष्काळ पडलेला असतांना मी नेत्रदात्यांचाही दुष्काळ असल्याचे एक पोस्टर बनवून लावले आणि प्रतिसाद वाढला. 'EYE DONATION-NEED OF THE NATION' असे एक घोषवाक्य एका पोस्टरसाठी सहजच तयार झाले.
आमच्या रुग्णालयातील नेत्रतज्ञ ,अधिष्टाते यांना भेटून,पत्र लिहून नेत्रदानाविषयीही काही करण्याविषयी सुचवले.श्री लंकेतून येणाऱ्या नेत्रांची व्यवस्था पाहणाऱ्या लायन्स क्लबमधून एक खास फ्लास्क मिळवून तो आमच्या नेत्रतज्ञांकडे सुपूर्द केला.नेत्र काढण्याचे प्रशिक्षणही ते घेऊन आले. कलपाक्कम रिक्रिएशन क्लबतर्फे भरणाऱ्या कार्निवलमध्ये स्टॉल मिळवून जनजागृतीचा पहिलाच प्रयत्न केला आणि चांगला प्रतिसाद मिळून तो माझा परिपाठच झाला. १० वर्षांत सुमारे १२०० प्रतिज्ञापत्रे भरली गेली, यात ६०% महिला होत्या.शास्त्रज्ञ म्हणवणाऱ्या नवऱ्याचा विरोध असतांनाही काही जणींनी ती भरली होती. आजही मला याच प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळतो.
कौटुंबिक, सामाजिक कारणे, आवडी- निवडी आणि मुख्यतः नेत्रदानातही अधिक काही करता येईल या विचारातून १९९२ साली मी मुंबईला बदली घेऊन आलो आणि कार्य थोडेफार वाढले. नेत्रदान मोहिमा कोणी घेत असल्यास किंवा घेण्याविषयी सुचवून त्यांना मदत करू लागलो. १९९३ च्या सुमारास बोरीबंदर रेल्वे स्थानकावर के सी महाविद्यालयातील मुलांनी मोहीम घेतली होती. रजा घेऊन (आज माझ्या अर्ध्या अधिक रजा या कार्यासाठीच घेतल्या जातात ) आणि माझ्याकडची तुटपुंजी पोस्टर्स(आज माझ्याकडे मोठाच संग्रह आहे ) घेऊन मी त्यांना सामील होत लोकांना माहिती देण्यासाठी तेथे ९ तास उभा राहिलो.हा माझा उभे राहण्याचा विक्रमच झाला. असाच तरुणांच्या उत्साहाला विविध ठिकाणी हातभार लावला.त्यासाठी दादर,चेंबूर,बोरीवली,ठाणे स्थानकांत बसलो. गणेशोत्सवात नेत्रदानावरील सजावटीसाठी हातभार लावला.'तरुण पिढी काही करीत नाही' या म्हणण्याला उत्तर देणारा उत्साह पाहिला तसाच थोडा विरोधाभासही पाहिला. काही ठिकाणी वृद्ध व्यक्ती नेत्रदानास तयार असतात परंतु तरुण अन मध्यमवयीन बिचकतात.
नेत्रचिकित्सा शिबिरे विविध उत्सव वगैरे निदान ५० ठिकाणी टेबल टाकून बसलो. किमान ५० ठिकाणी २ ते १० दिवसांचे स्टॉल घेऊन बसलो (बरेच स्टॉल मला उद्योजक महिलाच मोफत देतात) यात माझी पत्नी, पुष्पाचाही वाटा फार मोठा आहे. जरूर असेल तेथे रजा घेऊनही ती १०-१० तास माझ्याबरोबर बसते,साहित्याची हमाली करते,खाण्यापिण्याचेही पाहते,उभी राहून लोकांना इत्यंभूत माहितीही देते. इतर आवडी-निवडी,छंद बाजूला सारून मी किती वेळ श्रम आणि पैसा या कार्यात घालवतोय याचा कधीही विचार न करता तिची कृतिशील साथ अगदी १९८१ पासून मला कायमच लाभली आहे.
सुमारे ४०ठिकाणी मी पोस्टर प्रदर्शने भरवली आहेत.स्टॉल टाकून बसतो तेव्हा मी नेत्रदानासोबतच देहदान, त्वचादान, रक्तदान तसेच अवयवदानावरही माहिती आणि माहितीपत्रके देतो. (मी आतापर्यंत ३६ आणि पत्नीनेही ५-६ वेळा रक्तदान केले आहे)
उन,धूळ,वारा,पाऊस, भयानक उकाडा,विविध दर्प-वास -गंध ,कलकलाट,प्रसाधन गृह - पिण्याच्या पाण्याचा अभाव अशा विविध बाबींना तोंड देत चिकाटीने बसावे लागते, प्रसंगी मान-अपमान गिळावे लागतात. मी हे का करतो? काही जण याला सोशल वर्क म्हणतात, मी सोशल मार्केटिंग म्हणतो.नेत्रदानासाठी लोक आपल्याकडे येणार नाहीत,आपणच गर्दीत जाऊन बसले पाहिजे. बऱ्याच जणांची नेत्रदान करण्याची ,जाणून घेण्याची इच्छा असते परंतु कुठे जायचे ते माहिती नसते किंवा नेत्रपेढीत जायला वेळ नसतो किंवा जाणे राहून जात असते.अशांची सोय होते.
बरेच जण म्हणतात की हे मी समाधानासाठी करीत असेन. यात समाधान कसले? या महाप्रचंड देशात, महाप्रचंड लोकसंख्या असतांना,त्यात प्रचंड सुशिक्षित ,महासुशिक्षितही असतांना असे काही करावे लागावे,सव्वा कोटी दृष्टीहीनांपैकी तीस लाखांना अमूल्य दृष्टी मिळण्यासाठी लाख दीड लाख नेत्रदाने होणे अत्यावश्यक असतांना जाणाऱ्या ८०-८५ लाखांपैकी फक्त सुमारे १५ हजारांचीच होऊन या अगदी थोड्याच देशबांधवांना भयाण अंधकारात श्री लंकेतून येणाऱ्या नेत्रांकडे आशाळभूतपणे डोळे लावून बसावे लागावे याची खंत अन शरमच वाटते.
सुमारे १५ वर्षांपूर्वी २ डॉक्टरांची नेत्रदानावरील व्याख्याने ऐकल्यावर आपणही या विषयावर बरे बोलू शकू आणि त्यातून ही नितांत राष्ट्रीय गरज अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवता येईल असे वाटून मी व्याख्याने द्यायला सुरुवात केली.प्रोजेक्टरसारख्या सोयी सगळीकडेच नसतात तसेच सर्वसामान्यांना नेत्रदान-का?कसे?कधी?कोठे?कोणी?कोणासाठी? अशा प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे मिळाली तर जास्त चांगले होईल असे वाटले. लाजिरवाणे परावलंबन अधिक अधोरेखित करू लागलो. नेत्रदानावरील अधिकाधिक माहिती कायमच मिळवत जाऊन ती सादर करत गेलो. माहितीच्या अचूकतेवर भर दिला. नेत्रतज्ञांच्या उपस्थितीतही दिलेली व्याख्याने त्यांना आवडली. सुमारे १२ वर्षांपूर्वी डॉ. तात्याराव लहाने यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांच्या विभागातील सर्व नेत्रतज्ञांना बोलवून पुष्पगुच्छ देऊन माझा छोटासा सत्कार केला, आपल्या अल्पशा कार्याची पोचपावतीच मिळाल्यासारखे वाटले.सुमारे ६ वर्षांपूर्वी पार्ल्याच्या संवेदना प्रतिष्ठानने दीनानाथ नाट्यगृहात दादरच्या डॉ. निखील गोखलेंच्या उपस्थितीत नेत्र विषयावरील गाणी सादर करीत केलेला सत्कार म्हणजे कडीच वाटली. अशाच गाण्यांसह विरारच्या 'स्नेह' संस्थेने ४ वर्षांपूर्वी संस्मरणीय सत्कार केला होता.
इतरही काही सत्कार होऊन कार्य आणि मुख्यतः नेत्रदानाची माहिती विविध ठिकाणी पोचून जागृतीही झाली.
मुख्यतः मराठी तसेच हिंदी,इंग्रजीतून सुमारे १२५ व्याख्याने आतापर्यंत दिली. एखाद्या घरात १५-२० जण जमले तरी मी सीडी दाखवूनही अनौपचारिकपणे माहिती देऊ शकतो. वाशीच्या एका मारवाडी भगिनीने तिच्या नातीच्या बारशाच्या समारंभातच माझे नेत्रदानावर व्याख्यान ठेवणे हा एक विशेष अनुभव होता. तसे पाहता गुजराती,जैन,मारवाडी समाज नेत्रदानात अग्रेसरच आहे.
दूरदर्शन , ठाणे वार्ता वाहिनी तसेच आकाशवाणीवर मुलाखती झाल्या.बऱ्याच नियतकालिकांतून माझी आवाहने,पत्रे,लेखही प्रसिद्ध झाले.माझ्या कार्यावर काही जणांनी लेख लिहिले.या सगळ्यातून थोड्थोडा प्रतिसाद वाढत गेला. नेत्रदान हा गंभीर विषय विनोदी ढंगात आणि संवाद स्वरुपात सादर केलेली माझी 'डोळस दान' ही एकांकिका आणि नेत्रदानावरील माझ्या १४ कवितांचा 'प्रकाशाची पहाट' हा आगळावेगळा कवितासंग्रह पुष्पश्री प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केला.माझ्या मते मराठीतील ही एकमेवाद्वितीय अशी पुस्तके आहेत.
सुमारे १३-१४ वर्षांपूर्वी मी एक सविस्तर माहितीपत्रक बनवून त्यात मुंबई-पुण्यातील नेत्रपेढ्यांच्या दूरध्वनी क्रमांकांचाही अंतर्भाव केला.याचीच पुढे इंग्रजी आणि हिंदी भाषांतरेही केली. दहिसरमध्ये एका व्याख्यानात पत्नीची सौ.सुधा सांगळे यांच्याशी भेट होऊन त्यांच्या यजमानांनी गुजराती भाषांतर तसेच मुद्रणही करून दिले. स्टॉलसाठी,व्याख्याने,पोस्टर प्रदर्शने,पोस्टाने पाठविणे, घरी भेटायला येणाऱ्यांना वगैरे देण्यासाठी, विविध सभा- समारंभात वगैरे वाटण्यासाठी, दवाखाने-औषधांची दुकाने वगैरे ठिकाणी ठेवण्यासाठी, सूचना फलकांवर लावण्यासाठी वगैरे वगैरे नानाविध उपक्रमांसाठी मला हजारो माहितीपत्रके लागतात.यासाठी मला आतापर्यंत सुमारे ४५ प्रायोजक मिळाले असून सुमारे सव्वा लाख तरी माहितीपत्रके मी त्यांच्या मुद्रण सौजन्यामुळे प्रसृत केली असतील, त्यावरून काही जणांनी प्रती काढून वाटल्या असतील त्या वेगळ्याच! काही माहितीपत्रके तसेच स्टीकर्स ,कार स्टीकर्स, फ्लेक्स आणि कापडी फलक (banners) मीसुद्धा बनवून घेतले, यासाठीही काही प्रायोजक मिळाले. दवाखान्यांतून लावण्यासाठी एका शिक्षकांनी मला ११० बोर्ड बनवून दिले, काहींनी गणेशोत्सवात लावण्यासाठी banners बनवून दिली.
नेत्रदानाचा संदेश देणारी चष्मा कव्हर्स, पर्सेस तसेच कापडी पिशव्याही मी तयार करून घेतल्या आहेत.
सुमारे ५-६ हजारांनी तरी माझ्यामुळे प्रतिज्ञा पत्रे भरली असतील. आता मी मोजदाद ठेवणे बंद केले असून मी ती देतो आणि भरून परस्पर त्या त्या ठिकाणच्या नेत्रपेढ्या सांगून त्यांच्याकडे सुपूर्द करायला-पाठवायला सांगतो. व्याख्यानाच्या वेळी विविध मंडळे संस्था वगैरेंकडे १ प्रतिज्ञा पत्र देऊन त्यावरून प्रती काढायला सांगतो.
सुमारे २० जणांची प्रत्यक्ष नेत्रदाने माझ्यामुळे झाली,अप्रत्यक्ष बरीच झाली असावीत.गेलेल्या व्यक्तींच्या नातलगांचे बरेच फोन येऊन त्यांना माहिती, जवळच्या नेत्रपेढीचे दूरध्वनी क्र. आम्ही (कुटुंबीय) देतो किंवा कार्यवाही करतो. देहदानासाठीसुद्धा असे दूरध्वनी येत असतात.
आताच्या 'ई'युगात मी 'www.netradaan.blogspot.com' हा ब्लॉग सुरु केला असून सध्या यात प्राथमिक माहिती दिलेली आहे.क्रमशः त्यात भर पडेलच तसेच इतरही काही भाषांतून माहिती देण्याचा विचार आहे. 'ई' मेलवरून विविध परिचित तसेच (अनेक मार्गांनी 'ई' मेल पत्ते मिळवून) अपरिचितांनाही मी नेत्रदानावरील सविस्तर माहितीपत्रके पाठविणे सुरु केले असून त्यांनी ती अनेकानेकांना पुढे पाठवित रहाणे (forward करणे) अभिप्रेत अन अपेक्षित आहे.यातून शेकडो-हजारो-लाखो लोकांपर्यंत माहिती पोचून पुढेमागे मोठ्या प्रमाणात नेत्रदाने होऊन दृष्टिहिनांना अमूल्य दृष्टी मिळून श्री लंकेवरील आपले अत्यंत लाजिरवाणे परावलंबन नष्ट होण्यास मोठाच हातभार लागेल असा सार्थ विश्वास वाटतो. मी काही फार मोठे कार्य करीत आहे असे मला मुळीच वाटत नाही. डॉ. हडसन सिल्वांनी श्री लंकेत जे केले त्यापासून स्फूर्ति घेउन या देशाला नेत्रदानात स्वयंपूर्ण करण्यात मी खारीचा वाटा उचलत आहे एवढेच!
कोणालाही काही माहिती हवी असल्यास, शंका-कुशंकाही असल्यास तसेच विविध प्रकारे या कार्यात काही हातभार लावायचा असल्यास जरूर संपर्क साधावा.
- श्री.वि.आगाशे email : shreepad.agashe@gmail.com
माझा ब्लॉग : www.netradaan.blogspot.com
पत्ता- सी ५४, रश्मी संकुल, मनोरुग्णालय मार्ग, ठाणे (पश्चिम ) ४००६०४ दूरध्वनी क्र. २५८०५८००
कार्यालय - २५५९४०४९(श्री.वि.आगाशे), २५५९२२४२ (पुष्पा आगाशे)
भ्रमणध्वनि - ९९६९१६६६०७ (श्री.वि.आगाशे), ८१०८८१५८२० (पुष्पा आगाशे)
९८६९७७९०५० आणि ९८१९७४९०५० (आशिष आगाशे )
९८५०९६५४५२ आणि ९२७१२१६२९४ (अनिल आगाशे, अलिबाग )
परिचयात्मक आणि ग्रंथालीच्या थिंक महाराष्ट्रसाठी लिहिलेला हा लेख माहितीसाठी साभार सादर केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
I AM CHANDRASHEKHAR KHARE AN M.Sc. STUDENT OF INDIRA GANDHI AGRICULTURAL UNIVERSITY KRISHAK NAGAR RAIPUR (C.G.) IM INTERESSTED TO EYE DONET WORKING IN MY SOCIETY AND I KHOLEDGE IN MANT PATIENT TO NEEDY IN EYE AND IM ALSO KHNOLEGDGED IN DONER SO LPEASE ALL INFORM ME IN MY ADDRESS FOR TERM AND CONDITION OF DONER AND RECIEVER OF EYE IN NEEDY IN OUR SOCIETY IN C.G.
ReplyDeleteWe are urgently in need of kidney donors in Kokilaben Hospital India for the sum of $500,000,00,( 3 CRORE INDIA RUPEES) All donors are to reply via Email only: hospitalcarecenter@gmail.com or Email: kokilabendhirubhaihospital@gmail.com
ReplyDeleteWhatsApp +91 7795833215
ReplyDeleteD0NATE OR SELL YOUR K1DNEYS WITH THE SUM OF 500,000.00 USD,EMAIL FOR MORE INFORMATION : EMAIL : onlinecareunit@gmail.com
We are urgently in need of KlDNEY donors for the sum of $500,000.00 USD, WhatsApp or Email for more details: hospitalcarecenter05@gmail.com
ReplyDeleteWhatsApp +91 8681996093