Friday, January 21, 2011

प्रभाकर पणशीकर यांचे नेत्रदान

नुकतेच ज्येष्ठ कलाकार प्रभाकर पणशीकर यांचे निधन झाले. त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले गेले.'त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे नेत्रदान झाले' असे एक वाक्य फक्त काही वृत्तपत्रांत आले. अशा थोर व्यक्तीने सामाजिक भान ठेवून नेत्रदानाची इच्छा ठेवणे आणि त्यांच्या वारस कुटुंबियांनी ती जाणीवपूर्वक पूर्ण करणे ही विशेषच गोष्ट असून ती तेवढीच अभिनंदनीय अन अनुकरणीयही आहे.
त्यांच्या तमाम चाहत्यांना या निमित्ताने कळकळीची विनंती करावीशी वाटते की त्यांनीही या राष्ट्रीय गरजेचा गांभीर्याने विचार करून तसेच मानवतावादी दृष्टिनेही नेत्रदानाचा संकल्प करावा.
असा संकल्प म्हणजे त्यांना वाहिलेली कृतीशील श्रद्धांजलीच ठरेल.

- श्री.वि.आगाशे

1 comment:

  1. आगशेजी, देवेंद्र चुरीच्या पोस्ट वरची तुमची प्रतिक्रिया पहिली. खूप तळमळीनं लिहिलं आहे. साठ वर्षापूर्वी अनेकांनी इंग्रजांना या देशातून हाकलून लावायला प्राणांची बाजी लावली. आता आम्हाला आमच्याच राजकारण्यान विरुद्ध लढायची वेळ आली आहे.

    ReplyDelete