Saturday, June 11, 2011

नेत्रदान , त्वचादान आणि देहदान


दृष्टिदान दिवशीच श्रीराम दत्तात्रेय येरकुंटवार यांचे
नेत्रदान , त्वचादान आणि देहदान


काल दृष्टिदान दिवस होता.

सकाळी ७ च्या आधीच ठाण्यातील भास्कर कॉलनीत राहणाऱ्या श्री.गोपाळ जोशी यांचा मालाडहून दूरध्वनी आला की त्यांचे सासरे गेले आणि नेत्रदानाची कार्यवाही पूर्ण झाली असून आता त्वचादानासाठी शीवहून डॉक्टर येत आहेत.

५ दिवसांपूर्वी जोशींनी सासऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून मालाडच्या आसपासच्या नेत्रपेढ्यांचे दूरध्वनी क्रमांक विचारले होते.

२ वर्षांपूर्वी जोशींच्या मातोश्री गेल्यावर त्यांचे नेत्रदान जोशींनी केले होते.

आता त्यांचे सासरे अत्यवस्थ असतांना त्यांच्या वारसांनी नेत्रदानाचा दृढ संकल्प केला होता.

श्रीराम दत्तात्रेय येरकुंटवार यांचे निधन होताच त्यांच्या पत्नी उज्ज्वला तसेच कन्या प्रज्ञा आणि स्मिता यांनी नेत्रदानाचा संकल्प पूर्ण केलाच परंतु त्वचादानही करून नंतर देह्दानही केले.

त्यांची ही कृती उल्लेखनीय आहेच परंतु अनुकरणीयही आहे.

नेत्रदान तरुण मित्र मंडळाने तसेच त्वचादान शीव रुग्णालयाने घरी जाऊन स्वीकारले.देह सोमैया वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला गेला.

No comments:

Post a Comment