Thursday, January 5, 2012

Eye Donation calendar by S.V.Agashe

ठाण्याचे श्रीपाद वि. आगाशे गेली ३० वर्षे विविध मार्गांनी नेत्रदान प्रचार प्रसार करीत असून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते संपन्न झाले .
नेत्रदान क्षेत्रातील आपले श्री लंकेवरील लाजिरवाणे परावलंबन, आधी फॉर्म न भरलेल्या मृताचेही जवळच्या नेत्रपेढीला एक फोन करून नेत्रदान होऊ शकते , एका नेत्रदात्याचे दोन नेत्र २ ते ६ जणांना अमूल्य दृष्टी देऊ शकतात वगैरे महत्वाची माहिती तसेच मुंबई , ठाणे , कल्याण , डोंबिवली , पनवेलच्या नेत्रपेढ्यांचे दूरध्वनी क्रमांकही यात देण्यात आलेले आहेत. सण, उत्सव वगैरेंच्या अनुषंगाने त्यांच्या नेत्रदानावरील चारोळ्याही यात असून ' नव वर्षाचा नवा संकल्प , दृष्टीहीनांचा करू कायाकल्प ' हा संदेश त्यांनी जानेवारी महिन्यात दिला आहे.
आर्ट पेपरवरील ही देखणी दुरंगी दिनदर्शिका आगाशे यांच्या कडे सी ५४, रश्मी संकुल, मनोरुग्णालय मार्ग , ठाणे ( पश्चिम ) येथे ( दूरध्वनी २५८०५८०० , ९९६९१६६६०७ ) किंवा संजय बुक डेपो, गोखले रोड , ठाणे येथे मोफत उपलब्ध आहे.

2 comments:

 1. Respected Agashe Sir,

  I have joined your blog.I would like to join your work on spreading awareness about the noble cause of eye donation.Kindly advise further....

  ReplyDelete
  Replies
  1. Manasi,

   Thanks a lot for your praiseworthy wish to spread the awareness about the noble cause of eye donation.
   Kindly contact me on telephone so that we can discuss in detail.
   S.V. Agashe
   Tel. 022-25805800 , 9969166607

   Delete